शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भेदरलेल्या मुला-मुलींना खाकीचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:09 IST

खंडाळा : खंडाळा, खंबाटकी घाट आणि अपघात हे समीकरण काही नवे नाही. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतरच्या वळणावर बुधवारी रात्री खासगी बससह चार वाहनांच्या झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा खंबाटकी घाट भेदरला. रात्रीच्या अंधारात भयग्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना मात्र खंडाळा पोलिसांनी आधार दिला. या अपघातात पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली.खंबाटकी ...

खंडाळा : खंडाळा, खंबाटकी घाट आणि अपघात हे समीकरण काही नवे नाही. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतरच्या वळणावर बुधवारी रात्री खासगी बससह चार वाहनांच्या झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा खंबाटकी घाट भेदरला. रात्रीच्या अंधारात भयग्रस्त झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना मात्र खंडाळा पोलिसांनी आधार दिला. या अपघातात पुन्हा एकदा खाकी वर्दीतील माणुसकी मदतीला धावून आली.खंबाटकी घाटाने अनेक अपघात रात्री-अपरात्री पाहिले आहेत. खरंतर अशा वेळी अपघातग्रस्त प्रवाशांची परिस्थिती बिकट होत असते; पण प्रत्येकवेळी खंडाळ्यातील तरुणाई, पोलिस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून जातात. बुधवारच्या अपघातात रात्रीच्या अंधाराने विद्यार्थी व त्यांच्यासोबत आलेले नातेवाईक घाबरले होते. अपघाताची माहिती कळताच खंडाळा पोलिस आपल्या सहकाºयांसह घाटात पोहोचले. जखमींना तत्काळ उपचारासाठी खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु जखमींसह सोबत असणाºया इतर प्रवाशांना रात्र कुठे घालवावी, असा प्रश्न होता. पारगाव येथील विराज हॉलमध्ये सर्व प्रवाशांची निवासाची सोय करण्यात आली. खासगी वाहनाने खंडाळा येथून पारगावला विराज कार्यालयात सर्वांना पोहोचविले. हॉलमधील गाद्या, सतरंज्या, चादर अशा बिछाना कपड्यांची सोय करून थंडीपासून संरक्षणाची खबरदारी घेण्यात आली.सकाळी खंडाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे व अपघातावेळी नेहमीच मदतीसाठी अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ हे आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यालयात पोहोचले. सर्वांची चहा, बिस्किट व नाष्ट्याची सोय स्वखर्चाने केली. त्यामुळे अपघातग्रस्तांना आधार मिळाला. खंडाळा पोलिसांनी आपल्या नियमित कामासोबत माणसांप्रती जागविलेली माणुसकी निश्चितच कौतुकास्पद होती. सतत कोणत्याही कामात कठोर भूमिका घेणारे पोलिसांमध्ये माणुसकीचा झरा ओसंडून वाहत होता. केवळ तात्पुरती मदतच नव्हे तर या अपघातग्रस्तांना पुन्हा घरी पोहोचण्यासाठी खंडाळा येथून बसची सोय करून त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी देऊन पुणे रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचवले व इतर लागणारी मदतही अग्रेसर राहून केली.अन् मुले सावरली..खंबाटकी घाटात होणाºया अपघातात या अगोदरही पोलिसांनी मदत केली आहे. मात्र खंडाळा पोलिस स्टेशनला नव्याने कार्यभार सांभाळलेल्या युवराज हांडे यांनी आपले कसब दाखवत सर्वांना मदतीचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे योग्य नियोजन केले. त्यांच्यातील खाकी वर्दीतील माणुसकी गुरुवारी खंडाळकरांना अनुभवायला मिळाली. त्यामुळे अपघातग्रस्त दु:खात आणि भयभीत अवस्थेतही सावरले. मुलांच्या पालकांमधूनही खंडाळा पोलिसांचे कौतुक होत आहे.